२७ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:04+5:302021-02-13T04:19:04+5:30

पातूर : तालुक्यातील बाभूळगावाजवळ कारंजाकडे जाणाऱ्या ट्रकमधून २७ लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू गुटखा व ट्रक (अंदाजे किंमत १२ लाख ...

27 lakh banned tobacco gutkha seized | २७ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू गुटखा जप्त

२७ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू गुटखा जप्त

Next

पातूर : तालुक्यातील बाभूळगावाजवळ कारंजाकडे जाणाऱ्या ट्रकमधून २७ लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू गुटखा व ट्रक (अंदाजे किंमत १२ लाख रुपये) असा एकूण ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी जप्त केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माझोडमार्गे कारंजाकडे जात असलेला ट्रक क्रमांक (जी.जे एक्स ६९२२) ट्रकचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता सिनेस्टाईल पाठलाग करीत, ट्रकसह २७ लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा जप्त केला. ट्रकमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटख्याचे ४० पोते भरलेले आढळून आले. ट्रक चालक शब्बीर मिया कालुमिया मलिक (२८) (रा.आकोला संजय नगर हल्ली मुक्काम नयनपूर ता.महबदा जि.खेडा) याला ताब्यात घेतले. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार शिवाजी निखाडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित दुबे, पोलीस कॉन्स्टेबल असलम, लेडिज पोलीस कॉन्स्टेबल पूजा इंदोरे यांनी केली. ट्रक पातूर पोलीस स्टेशनला जमा केला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: 27 lakh banned tobacco gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.