शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

आयटीआयच्या जागा २,७०० अन् अर्ज ८ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:23 AM

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे ...

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे यंदा निकालही ९८ टक्क्यांवर लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ झाली असल्याने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २,७९६ जागा आहेत. परंतु त्यासाठी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता प्रवेशासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. एकेकाळी आयटीआयचे महत्व कमी झाले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या. परंतु अलिकडच्या तीन-चार वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये औद्योगिक क्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता या औद्योगिक शिक्षणाकडे कल वाढत चालला आहे. आयटीआयची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या शासकीय ८ आणि खासगी २ संस्था आहेत. या १० संस्थांमध्ये एकूण २,७९६ जागा आहेत. या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार २७३ अर्ज केले आहेत. जागा कमी अन् उमेदवार जास्त झाल्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत आहे.

विद्यार्थ्यांनी केलेले प्रवेश अर्ज असे

अकोला- २,६२९

अकोट- १,१९७

बाळापूर- ९८५

बार्शीटाकळी- ७१४

मूर्तिजापूर- १,११३

पातूर- ६७४

तेल्हारा- ९६१

एकूण जागा- २,७९६

एकूण अर्ज- ८,२७३

शासकीय संस्था- ८- २६१६

खासगी संस्था-२- १८०

आयटीआयमध्ये असलेले रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पाहता, विद्यार्थी व विद्यार्थिनींचा आयटीआयकडे कल वाढत आहे. त्यामुळेच यंदा हजारो विद्यार्थ्यांनी आयटीआयटी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी व्यवसाय, नोकरीकडे वळू शकतो. त्यामुळेच आयटीआयला पसंती मिळत आहे.

-आर. टी. मुळे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)