शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

बियाण्यांचे ३00 संशयीत नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2016 12:41 AM

बुलडाणा जिल्ह्याभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.

गणेश मापारी खामगाव (जि. बुलडाणा), दि. ४- बुलडाणा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करुन संशयीत असलेल्या २७९ बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने संकलीत केले आहेत. नागपूर येथील शासकीय बिज परीक्षण प्रयोग शाळेत सदर नमूने जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर बियाणे विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.गत तीन-चार वर्षांमध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरणार्‍या शेतकर्‍यांपेक्षा नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पसंती असलेल्या सोयाबीन बियाण्यांची बनावट पाकिटे तयार करुन विक्री केल्या जातात. कपाशी, तूर, मूग, उडिद या पिकांच्या बाबतीतही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांकडून कोणत्याही परिस्थितीत बनावट बियाणे विकल्या जावू नये यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकाच्या माध्यमातून दरवर्षी कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे मुदतबाह्य बियाणे विक्री, बियाणे खरेदी व विक्रीमधील तफावत यासह इतर मुद्यांवर संशय असल्यास कृषी विभागाकडून संबंधित बियाण्यांचे नमूने प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी घेण्यात येतात. भरारी पथकाने यावर्षी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून २७९ संशयीत बियाण्यांचे नमूने तपासणीसाठी घेतले आहेत. ही सर्व संशयीत नमूने नागपूर येथील शासकीय बीजपरीक्षण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी असलेल्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे.किटकनाशकांची तपासणी गरजेचीसंग्रामपूर तालुक्यात नुकतेच एका कृषी सेवा केंद्रातून मुदतबाह्य किटकनाशकाची विक्री केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पेरणी झाल्यानंतर फवारणीसाठी किटकनाशक औषधांची मोठय़ा प्रमाणात विक्री केल्या जाते. याचाच फायदा घेवून विक्रेते मुदतबाह्य औषधांची विक्री करतात. त्यामुळे कृषी विभागाने किंवा भरारी पथकाने संशयित बियाण्यांच्या तपासणीप्रमाणेच किटकनाशके तसेच खतांचे नमूने देखील तपासणीसाठी घेण्याची गरज आहे.कृषी सेवा केंद्रांकडून बोगस बियाण्यांची विक्री होवू नये त्यासोबतच कोणत्याही बियाण्यांची विक्री नियमानुसारच व्हावी यासाठी कृषी विभागाकडून तपासणी केल्या जाते. जिल्ह्याभरातून संशयीत बियाण्यांचे नमूने घेण्यात आले असून सदर बियाणे तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.- ए.ओ. चोपडे, मोहिम अधिकारीकृषी विभाग जि.प.बुलडाणा