अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 07:42 PM2021-02-23T19:42:50+5:302021-02-23T20:17:34+5:30
Akola Police शुभांगी दिवेकर कोरडे, वैशाली आढाव या दोन महीला अधिकाऱ्यांचा समावेश
अकोला : पोलिस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षक ते नि:शस्त्र पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या यादी मध्ये अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांचा समावेश असून या मध्ये दोन महीला अधिकारी सुध्दा आहेत.
पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील ४३८ अधीकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे.यामध्ये अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलिस अधीक्षक कार्यालय आस्थापनेवरील संग्रामसिंग पाटील, गजाननसिंग बायसठाकुर या ४ अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.पदोन्नतीवर शुभांगी कोरडे-दिवेकर यांची पोलिस प्रशिक्षण येथून जिल्हा जात पडताळणी समिती अकोला, वैशाली आढाव यांची राज्य गुप्तवार्ता येथून पोलीस महासंचालक कार्यालय मुबंई, संग्रामसिंग पाटील व गजाननसिंग बायसठाकुर यांची मुबंई येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथून नरेंद्र देशमुख यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.