२६ हजार विद्यार्थी देणार आॅनलाइन कलमापन चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:23 PM2019-12-27T15:23:15+5:302019-12-27T15:23:20+5:30

अकोला : राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व प्रशिक्षण परिषद व श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढावी, गुणवत्ता उंचवावी ...

4,000 students will take online grammar test! | २६ हजार विद्यार्थी देणार आॅनलाइन कलमापन चाचणी!

२६ हजार विद्यार्थी देणार आॅनलाइन कलमापन चाचणी!

Next

अकोला: राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व प्रशिक्षण परिषद व श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढावी, गुणवत्ता उंचवावी आणि विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे कळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील फेब्रुवारी-मार्च २0२0 च्या दहावीची परीक्षा बसणाऱ्या २६ हजार विद्यार्थ्यांची मोबाइल अ‍ॅपद्वारे आॅनलाइन कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. २७ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात येणार असून, पालक व विद्यार्थ्यांनी कलमापन चाचणीला गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.
गतवर्षीपासून अकोला जिल्ह्यातील इयत्ता दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. या कलमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावी आणि गुणवत्ता उंचवावी, हा उद्देश आहे. गतवेळी चाचणीला शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा कलमापन चाचणी घेण्याच्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता, समुपदेशक नियोजन करीत आहेत. कलमापन चाचणीचे नियोजन करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी भारत स्काउट गाइड कार्यालयात शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वच शाळांमधील इयत्ता दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांची मोबाइलवरून आॅनलाइन कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून नीता जाधव (बिडवे) आहेत तर प्रत्येक तालुक्यात दोन समन्वयक असे १४ समन्वयक नेमण्यात आले आहेत. कृषी, ललित, कला, वाणिज्य, तांत्रिक, गणवेशधारी सेवा, आरोग्य विज्ञान असे सात क्षेत्र आणि चार अभिक्षमता यावर आधारित ही चाचणी घेण्यात येईल. त्यात १४0 विधाने राहतील. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा कल दिसून येणार आहे. त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर घडवावे, हे यातून स्पष्ट होणार आहे. कलमापन चाचणी देणाºया विद्यार्थ्यांना ‘डाएट’च्या समुपदेशन केंद्राकडून करिअरविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कलमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. विद्यार्थ्यांच्या कलानुसार विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते. त्यांचा कल पाहून विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केल्या जाते. त्यामुळे चुकीचे करिअर क्षेत्र निवडण्यापासून विद्यार्थी व पालक सावध होतात.
-नीता जाधव (बिडवे), जिल्हा समुपदेशक
कल व अभिक्षमता चाचणी

Web Title: 4,000 students will take online grammar test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.