लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला: नजीकच्या देऊळगाव येथील ४२ वर्षीय शेतकरी भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पातूर ते देऊळगाव रस्त्याच्या कडेला जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ही या गावातील २६ वी शेतकरी आत्महत्या आहे. भिकाजी ज्ञानदेव ढोले यांच्याकडे केवळ एकरभर कोरडवाहू शेतजमीन आहे. या शेतात पेरलेले सोयाबीनचे पीक सध्या वाळलेल्या अवस्थेत आहे. रोजगाराचा अभाव, डोक्यावर कर्जाचे ढीगभर ओझे यामुळे संसार गाडा ओढणे अशक्य झाल्याने भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती गावकर्यांनी दिली. मृतक भिकाजी ढोले यांच्या पश्चात त्यांची पत्नी, पहिल्या वर्गात शिक्षण घेतलेली एक मुलगी, तीन वर्षे वयाचा मुलगा व म्हातारी आई असा आप्त परिवार आहे. गावाच्या नावात देऊळगाव असले तरी प्रत्येक दहा घरामागे एक शेतकरी याप्रमाणे आजपावेतो २६ शेतकरी आत्महत्या या एकाच गावात झाल्या असल्याने अख्खे गाव हादरून गेले आहे. शासनाने या गावात एखादा पथदश्री प्रकल्प राबवून येथे सातत्याने होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)फोटो
देऊळगाव येथे ४२ वर्षीय शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 8:18 PM
शिर्ला: नजीकच्या देऊळगाव येथील ४२ वर्षीय शेतकरी भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पातूर ते देऊळगाव रस्त्याच्या कडेला जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ही या गावातील २६ वी शेतकरी आत्महत्या आहे.
ठळक मुद्देदेऊळगावात अतापर्यंत झाल्या २६ शेतकरी आत्महत्याविष प्राशन करून संपविली जीवनयात्रादेऊळगावात शोककळा