- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडे २२ जानेवारी रोजीच्या पत्रानुसार करण्यात आली आहे.राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या क्षेत्रातील ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण आणि नागरी भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून २४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील दुष्काळग्रस्त गावातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीतील चालू वीज देयकांचा खर्च शासनामार्फत टंचाई निधीतून भागविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ५१५ नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रकमेसह नोव्हेंबर महिन्याच्या वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २२ जानेवारी रोजीच्या पत्रानुसार करण्यात आली आहे.पाणी पुरवठा योजना वीज देयकांच्या निधीची अशी आहे मागणी!-नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम: २५ लाख ९३ हजार ९२ रुपये.-नळ पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर महिन्याच्या वीज देयकांची रक्कम: २३ लाख ३८ हजार ३२० रुपये.
पाणी पुरवठा योजनांच्या थकित वीज देयकांसाठी हवे ४९ लाख !
जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात अशा आहेत पाणी पुरवठा योजना!क्षेत्र योजना अकोला ग्रामीण ६२अकोला शहर ५५बाळापूर १०५बार्शीटाकळी ५६मूर्तिजापूर १०६तेल्हारा १२६अकोट ०५....................................................एकूण ५१५
जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील ५१५ नळ पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांच्या मूळ थकबाकीच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या वीज देयकांची रक्कम अशी एकूण ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांची रक्कम टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे.-पवनकुमार कछोट,अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला.