संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही काेराेना अद्यापही कायमच आहे. मध्यंतरी फेब्रुवारी ते मे महिन्यात काेराेनाची दुसरी लाट आली हाेती. ही लाट ओसरली असली तरीही जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची चणचण आहे. ही बाब पाहता राकाँचे प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दीकी यांनी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी व महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयाेजन केले हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्याम बाबू अवस्थी तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिदास भदे, प्रा. विश्वनाथ कांबळे, सय्यद युसूफ अली उपस्थित हाेते. शिबिरात ६१ युवकांनी व काही महिलांनी सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी नगरसेविका उषा विरक, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर , माजी गटनेता मनाेज गायकवाड, नकीर खान, अफसर कुरेशी, संतोष डाबेराव, दिलीप देशमुख, बेनी पहेलवान, सुषमा निचळ आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक फैयाज खान व माजी अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल अनीस यांनी केले होते.
राष्ट्रवादीच्या शिबिरात ६१ युवकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:19 AM