७५ वर्षीय विमला आजींनी घातला राहुल गांधींना कापसाचा हार ! शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आजी उतरल्या रस्त्यावर
By राजेश शेगोकार | Published: November 18, 2022 04:44 PM2022-11-18T16:44:32+5:302022-11-18T16:45:35+5:30
विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या या नित्याच्याच आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या या नित्याच्याच आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत तथा विमा नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी बाबुळगाव येथील विमल वसंत तिडके या ७५ वर्षीय आजीबाई भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. राहुल गांधीनींही भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला. विमला तिडके कापसाचा हार घेऊन राहुल यांची प्रतीक्षा करीत होत्या.
रात्रभर जागून बनवला हार!
विमल वसंत तिडके या आजीने रात्रभर जागून कापसाचा हार बनविला. सकाळी त्यांच्या स्वागतासाठी त्या रस्त्यावर उभ्या होत्या. राहुल गांधी यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारला. यशोदा खडसे, गीता तिडके, दिव्या तिडके, शारदा फटकर, मीना डीवरे, मंगला फटकर राहु स्वागत केले.