महिलांची आरोग्य सेवा
प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. हे प्रमाण ६५.९ टक्के आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५६.२ टक्के होते.
मुलांचे लसीकरण
जिल्ह्यात १२ ते २३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाचे प्रमाण २०१९-२० मध्ये तुलनेने कमी झाले. २०१५-१६ मध्ये ५०.८ टक्के मुलांनी सर्व लसी घेतल्या होत्या. मागील पाच वर्षात हे प्रमाण जवळपास ६९.५ टक्के एवढे आहे. मागील पाच वर्षांत जन्माला आलेल्या ९७.८ टक्के मुलांना बीसीजी लस टोचली आहे.
२०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे मुली - ९३४
२०१९-२० मध्ये हजार मुलांमागे मुली - ८९६
जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत गर्भवतींसाठी आवश्यक सर्वच सुविधा पुरविण्यात येत आहेत. शासनाच्या सर्वच योजनांनुसार गर्भवतींना सुविधा पुरविल्या जातात. तसेच शिशूच्या जन्मानंतर आवश्यक सर्वच लसी आरोग्य विभागामार्फत दिल्या जातात.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला