...अन् सर्पमित्राने अलगद झेलला साप

By Atul.jaiswal | Published: February 3, 2024 06:32 PM2024-02-03T18:32:42+5:302024-02-03T18:33:04+5:30

या मंदिरात अचानक ६ फुल लांबीचा धामण साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 

a young man caught the snake | ...अन् सर्पमित्राने अलगद झेलला साप

...अन् सर्पमित्राने अलगद झेलला साप

अकोला : वन्यजीवांची सेवा करण्याचा वसा घेतलेले सर्पमित्र हे केवळ मानवीवस्तीत आढळून येणाऱ्या सापांना पकडून नागरिकांना भयमुक्तच करत नाही, तर सापांना ईजा होऊ नये याचीही पुरेपुर काळजी घेतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिरात शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका प्रसंगातून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली. मानद वन्यजीव रक्षक तथा सर्प मित्र बाळ काळणे यांनी रेस्क्यू करताना टीनाच्या शेडवरून खाली पडणाऱ्या सापाला अलगद झेलून त्याचे संरक्षण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. शनिवारी या मंदिरात अचानक ६ फुल लांबीचा धामण साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 

काही भाविकांनी ही बाब सर्पमित्र बाळ काळणे यांना कळविली. माहिती मिळताच काळणे कृषी विद्यापीठ परिसरातील मंदिरात दाखल झाले. यावेळी साप मंदिराभोवती असलेल्या टीन पत्र्याच्या शेडच्या ॲँगलला वेटाळे मारुन बसल्याचे दिसून आले. काळणे यांच्या एका सहकाऱ्याने काठीच्या सहाय्याने सापाला ढकलण्याचा प्रयत्न केला. साप दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना खाली कोसळला. यावेळी काळणे यांनी सापला अलगद झेलून घेतले. साप फरशीवर पडून जखमी होऊ नये यासाठी काळणे यांनी त्याला वरचेवर झेलून घेतल्याचे पाहून भाविकांनी त्यांचे आभार मानले. पकडलेल्या सापाला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. यावेळी समाधान इंगळे, विलासराव देशमुख, पवन काळे, देविदास कोगदे यांच्यासह शहरातील भाविक उपस्थित होते.

Web Title: a young man caught the snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला