अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:59 PM2020-03-05T17:59:35+5:302020-03-05T17:59:41+5:30
परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.
अकोला: कृषी पंपांसाठी वीज जोडणी घेतली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरून त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य दिल्याने परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थींना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थींना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरावयाची होती.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अकोला परिमंडळांतर्गत असणाºया अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१३ आणि दुसºया टप्प्यातील ३७ शेतकºयांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४०९ आणि दुसºया टप्प्यातील ५०३ शेतकºयांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १४२१ आणि दुसºया आणि तिसºया टप्प्यात ३२५ अशी परिमंडळातील एकूण ३३८० शेतकºयांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.
एकूण तीन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, टप्पा दोन व तीनचे एकत्रित काम प्रगतिपथावर आहे. दुसºया व तिसºया टप्प्यात परिमंडळांतर्गत एकूण ६६७१ सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ९४९४ शेतकºयांच्या अर्जांना मंजूर करीत त्यांना त्यांचा वाटा भरण्यासाठी कोटेशन पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४६०७ शेतकºयांकडून पैसे भरून एजन्सीची निवड करण्यात आली आहे.