मागण्या मान्य करा, अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:53+5:302021-06-20T04:14:53+5:30
उद्यापासून कामबंद आंदोलन आंदोलनाची सुरुवात सोमवार, २१ जूनपासून होणार आहे. २१ आणि २२ जून रोजी सकाळी ८ ते १० ...
उद्यापासून कामबंद आंदोलन
आंदोलनाची सुरुवात सोमवार, २१ जूनपासून होणार आहे. २१ आणि २२ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत कामबंद आंदोलन, तर २३ आणि २४ जून रोजी पूर्णवेळ कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
या आहेत मागण्या
परिचारिकांची पदे १०० टक्के भरावीत.
परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता ७२०० देण्यात यावा.
क्वाॅरंटाइन रजा व साप्ताहिक सुटी देण्यात यावी
परिचारिकांचे पदनाम बदल करण्यात यावे
कोरोनाकाळात सर्व रजा स्थगित केल्यामुळे ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत आहेत.
त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी.
७व्या वेतन आयोगाचे व महागाई भत्त्याचे थकीत हप्ते देण्यात यावे.