दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:04 PM2019-06-03T13:04:11+5:302019-06-03T13:04:22+5:30

तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.

Accounting for allocation of drought relief account! | दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

Next

- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वितरित करण्यात आली; मात्र त्यापैकी किती मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आणि प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात लेखाजोखा मागत संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तअकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त २ लाख १२ हजार शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयार्फत गत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान जिल्ह्यातील संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आतापर्यंत बँकांमध्ये किती रक्कम जमा करण्यात आली आणि बँकांमार्फत किती शेतकºयांच्या खात्यात किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.

दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी अशी वितरित करण्यात आली मदत!
तालुका                  रक्कम (लाखांत)
अकोला                    ३६,३७,९२,७४८
बार्शीटाकळी             २२,६७,४८,६३८
तेल्हारा                    २१,१६,२५,११५
बाळापूर                  २८,०१,३७,६६७
मूर्तिजापूर               २९,०८,२०,३९४
................................................
एकूण                      १३७,३१,२४,५६२

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १३१ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वाटप करण्यात आली. वितरित मदतीच्या रकमेपैकी बँकांमध्ये जमा केलेली मदतीची रक्कम आणि बँकांमार्फत आतापर्यंत प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या खात्यात किती मदतीची रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तहसीलदारांकडून माहिती मागितली आहे. यासंदर्भात ६ मे रोजी बँक अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे.
-जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी.

 

Web Title: Accounting for allocation of drought relief account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.