एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:09 PM2020-04-04T15:09:52+5:302020-04-04T15:10:04+5:30

विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.

Action on more than a thousand vehicles | एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई

एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई

Next

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाउन केले असून राज्य शासनाने कठोर पावले उचलत संचारबंदी लागु केलेली असतांनाही विनाकारण बाहेर फीरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत दोन दिवसांमध्ये तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.
राज्यातील संचारबंदी तर केंद्राने लागु केलेल्या लॉक डाऊनच्या १२ दिवसानंतरही नागरिक कीराणा, भाजी आणण्याचा कारणे सांगुण विनाकारण शहरात फीरत असल्याचे वाहतुक शाखेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गत दोन दिवसांपासून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. शेजारील बुलडाणा जिल्ह्यात तसेच वाशिम जिल्हयात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यावरही अकोलेकर जागृत होत नसल्याने आता बाहेर फीरणाºया वाहन चालकांची योग्य ती पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी सुुरु केला आहे. या सपाटयामध्ये त्यांनी गत दोन दिवसात तब्बल एक हजारापेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत त्यांच्यकडून २० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर विनाकारण व रिकामटेकडयांची तब्बल २८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करतांना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. मात्र शहरात फीरणारे हे रिकामटेकडे पोलिसांनी अडविले तर दवाखान्यात चाललो, औषधी आणायला चाललो, भाजी किराणा, दूध आणायला चाललो असे सांगून सुटका करून घेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निदेर्शाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कशाचीही हयगय न करता विनाकारण रस्त्यावर फीरणारे दुचाकीचालक, आॅटो व इतर वाहने अशा एकून एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर २८० पेक्षा अधिक वाहने जप्त करून ती वाहतुक शाखेत ठेवण्यात आली आहेत.
 
 
कोरोना या गंभीर संसर्गजन्य विषानुला अकोलेकर अद्यापही मस्करीत घेत असल्याचे एकुनच परिस्थीतीवरुन दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा सपाटा सुरु करीत यावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र अकोलेकरांनीही परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाºया वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिले असून त्यानंतर आता ही मोहिम अधिक धडाक्यात राबविण्यात येणार आहे.
- गजानन शेळके
वाहतुक शाखा प्रमूख

 

Web Title: Action on more than a thousand vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.