अकोला : कोविडवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून, या औषधांच्या उपलब्धतेसाठी अन्न व औषधे प्रशासन विभाग सज्ज आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (औषधे) वि. दा. सुलोचने यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या रेमडेसिविर कोविड हॉस्पिटल्सशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. तसेच शासकीय रुग्णालयातही साठा आहे. ज्यांना रेमडेसिविर इंजेक्शन्स हवे असतील त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी सही, शिक्क्यासह, तसेच आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड, खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीचे फोटो ओळखपत्र दुकानदारास दाखवणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात अकोला शहरातील आयकॉन मेडिकल, व्हीएनआरएन मेडिकल, दत्त मेडिकल, वर्षा मेडिकल, ॲपल मेडिकल, मैत्री मेडिकल, आरोग्यम स्वस्त औषधी, वननेस फार्मा, जाई मेडिकल, सूर्यचंद्र मेडिकल, केअर मेडिकल, आधार मेडिकल येथे, तर मुर्तिजापूर येथील अवघाटे मेडिकल व सुविधा मेडिकल या ठिकाणी रेमडेसिविर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तथापि, कुणालाही यासंदर्भात औषध उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण झाल्यास अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी औषध निरीक्षक सं. मो. राठोड (मोबाईल क्रमांक ९९२३३०४६५०) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सुलोचने यांनी स्पष्ट केले आहे.