अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:34 AM2017-09-07T01:34:38+5:302017-09-07T01:34:47+5:30
माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील शाळांना मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया लवकरच होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील शाळांना मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यापूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयात अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात येत आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होताच, समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल.
गतवर्षी जिल्हय़ामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील काही शिक्षक वगळता, उर्वरित शिक्षकांचे रिक्त जागा असलेल्या शाळांवर समायोजन करण्यात आले होते. यावर्षीसुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शाळांकडून शिक्षकांची पदसंख्या, आरक्षण, रिक्त पदे याची माहिती मागविली. जिल्हय़ातील जवळपास ८२ शाळांनी त्यांच्या संचमान्यतेसंबंधीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. संचमान्यतेच्या प्रस् तावामधील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्ये यावर्षी १४0 च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे, तसेच शाळांमधील ७0 ते ८0 जागा रिक्त असणार असून, या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल.
अतिरिक्तची शिक्षकांना भीती
२0१६ व १७ ची नवीन संचमान्यतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, या प्रक्रियेदरम्यान शाळांमध्ये अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांची ऑनलाइन माहिती मागविण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची प्र तीक्षा यादी तयार करण्यात येत आहे.
सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सं पल्यानंतर अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हय़ात १४0 च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
- प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी.