आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 02:58 PM2019-06-01T14:58:45+5:302019-06-01T14:58:54+5:30
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला.
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला. त्यामध्ये ६५ लाख ५०० रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून आठ नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांचा प्रस्ताव प्रशसकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत नळ योजनेची विशेष दुरुस्ती पाटी व वडद येथील नळ योजना विशेष दुरुस्ती, बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना वडाळा, पिंपळगाव चांभारे, शिंदखेड, रुस्तमाबाद आणि बाळापूर तालुक्यातील पारस इत्यादी आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी ६५ लाख ५०० रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
३० जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश!
प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आठ नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करून त्याद्वारे प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणांना आदेशात दिले आहेत.