आंदोलने उंदड झाली...कोरोनाची भीती ना उरली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:45 PM2020-10-04T18:45:53+5:302020-10-04T18:46:01+5:30
Political Agitation continue in Akola सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही राजकीय आंदोलनबाजी मात्र जोरात आहे.
अकोला : कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ^‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही राजकीय आंदोलनबाजी मात्र जोरात आहे. कोरोना संसंर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सींग पाळा असे कानाकपाळी आरोडून सांगणाºया सत्ताधाºयांसह विरोधकांनाही याच नियमाचा विसर पडत असल्याने कोरोनाची भिती उरली का? हा प्रश्नच आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण या घटनांमुळे सध्या देशभरात वाढळ उठले आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना असे प्रमुख पक्ष सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून या प्रश्नांवरची आपली भूमिका लोकांपर्यत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न व अधिकार मान्य केला तरी कोरोनाच्या संकटात अशा आंदोलनातील उपस्थितीची संख्या मर्यादीत ठेवणे सहज शक्य होते.
कोरोनाच्या संकट संपलेले नाही. त्यामुळेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी जाणीव निर्माण करणारी मोहीम सुरू आहे. या मोहिमेमधून दोन लाख ४२ हजार ४६१ नागरिकांचे तपासणी करण्यात आली त्यामध्ये कोरोनाचे लक्षणे असलेली ६१ रूग्ण आढळून आले असून, तब्बल ४,२७५ रूग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आले हे सर्व कोरोनाच्या धोका पातळीत येतात. हे संकट थोपवणे खरेच एकट्या शासकीय बळावर शक्य होणार नाही, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे गरजेचे बनले आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांची प्राथमिकता अगोदर संकटापासून बचावणे हीच असायला हवी. मात्र सध्याचे राजकीय आंदोलनाचे चित्र पाहता कोरोना संपला अशाच थाटात राजकारण अनलॉक झाले आहे.