- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर शेतीशाळा, बैठका, प्रशिक्षण आदी समूह संपर्काची कामे करण्यास राज्यातील कृषी सहायकांनी नकार दिला आहे. कोरोना संकटाच्या काळात समूह संपर्काच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे पत्र कृषी सहायक संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी २३ रोजी राज्याच्या कृषी आयुक्तांना दिले.कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये राज्यातील कृषी विभागांतर्गत कार्यरत कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत आहे. २३ सप्टेंबरपर्यंत कृषी विभागातील २०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली असून, त्यामधील ९ जणांचा मृत्यू झाला असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. गाव पातळीवर होणाºया ग्रामसभा, शेतकरी बैठका, शेतीशाळा, मिळावे मेळावे, प्रशिक्षणे इत्यादी कामे करतांना समूह संपर्कातून कृषी सहायकांना आणि कृषी सहायकांकडून शेतकºयांना कोरोना संसर्ग होत आहे. त्यामुळे करुणा संकटाच्या परिस्थितीत समूह संपर्काच्या कामांवर कृषी सहायक संघटना बहिष्कार टाकत असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूसाहेब शेंडगे यांनी २३ सप्टेंबर रोजी राज्याच्या कृषी आयुक्तांना दिले. त्यानुसार राज्यातील कृषी सहायकांनी समूह संपर्काच्या कामांवर बहिष्कार सुरू केला आहे.योजना अंमलबजावणीचे काम करणार!कोरोना संकटाच्या परिस्थितीत समूह संपर्काच्या कामांवर बहिष्कार टाकण्यात आला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे कृषी सहायक संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी कृषी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.कोरोना संकटाच्या काळात शेतीशाळा, बैठका, प्रशिक्षणे आदी संपर्काच्या समूह संपर्काच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने घेतला आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. तथापि, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत.- अनंत देशमुखराज्य कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना