‘पीडीकेव्ही’मध्ये कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव प्रशिक्षण कार्यक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:23 PM2020-02-12T12:23:49+5:302020-02-12T12:23:55+5:30
दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद््घाटन करण्यात आले.
अकोला : उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद््घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदद्वारा संचालित कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी, हैद्राबाद यांच्यातर्फे ‘उद्योजकता परिसंस्था विकसित करण्यासाठी कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव यामध्ये वाढ करणे’ या विषयावर दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी. जी. इंगोले यांच्या हस्ते मंगळवारी कार्यशाळेचे उद््घाटन झाले. २० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये २७ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. यावेळी डॉ. के. एच. राव, कार्यक्रम संचालक आणि समन्वयक (कॉपोर्रेट रिलेशनशिप सेल) व डॉ. बी. एस. सोनटक्की, विभागप्रमुख (विस्तार प्रणाली व्यवस्थापन) कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी हैद्राबाद, डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एस. एस. हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार डॉ. विवेक खांबालकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. धीरज कराळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.