- सचिन राऊत
अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी असून, यामधील सुमारे १३५ कैद्यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला हाेता़. एकाचवेळी या कैद्यांना काेराेनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले हाेते़ मात्र, त्यानंतर आवश्यक त्या उपाययाेजना करून तसेच खबरदारी घेत आता कारागृह काेराेनामुक्त झाले आहे़ नवीन येणाऱ्या कैद्यांपासून इतर कैद्यांना धाेका निर्माण हाेऊ नये म्हणूण नवीन कैद्यांना रेल्वे स्टेशननजीक असलेल्या तात्पुरत्या कारागृहात १४ ते १५ दिवस ठेवण्यात येते व त्यानंतरच त्यांना दाेन वेळा काेराेना चाचणी केल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे़.
अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी व तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. काेराेनाच्या भीषण संकटामुळे येथील काही कैद्यांना जामिनावर साेडण्यात आले आहे, तर गंभीर गुन्ह्यातील कैदी आता कारागृहात आहेत़ या कैद्यांची आकडेवारी सुमारे ४५७ असून त्यांना काेराेना हाेऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययाेजना कारागृह प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले असून, कैद्यांना कारागृहात सामाजिक अंतर पाळण्यासाठी नियम ठरवून देण्यात आले आहेत, तर कुणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे़. त्यामुळे काेराेना राेखण्यात कारागृह प्रशासनाला यश आले आहे़.
१०० टक्के लसीकरण
कारागृहातील ४५७ कैद्यांसह ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे़. येथील सर्वांनाच पहिला डाेस देण्यात आला असून, आता लवकरच दुसरा डाेस देण्याचीही तयारी कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे़. आराेग्य विभागाकडूनही वारंवार तपासणी करण्यात येत असून, यामध्ये गत अनेक महिन्यांपासून एकाही कैद्याला किंवा कर्मचाऱ्याला काेराेना झाला नसल्याचे वास्तव आहे़.
नवीन कैद्यांना ठेवतात तात्पुरत्या कारागृहात
मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे़ यामध्ये कुणालाही काेराेना नसल्याने नवीन कैद्यांपासून त्यांना काेराेनाचा धाेका निर्माण हाेऊ नये म्हणूण शिक्षा झालेल्या तसेच नव्याने गुन्हा केलेल्या कैद्यांना तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी ठेवण्यात येते़ त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर व ॲन्टिजन टेस्ट केल्यानंतरच त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येत आहे़
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे़ येथील कैद्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे़ मात्र, तरीही काेराेनाला राेखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययाेजना करण्यात येत असून, त्यासाठी सर्वांचीच आराेग्य तपासणीही वारंवार करण्यात येत आहे़
- सुभाष निर्मळ
कारागृह अधीक्षक, अकाेला