अकोला: वºहाडी बोलीभाषेला सातासमुद्रापार नेण्याचा ध्यास घेतलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंचाचे दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन २ व ३ जून रोजी अकोल्यात होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे राहतील. संमेलनाचे उद्घाटन लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्षपदी दुबईचे मसाला किंग डॉ. धनंजय दातार राहतील. संमेलनाचे प्रमुख आकर्षण अभिनेता भारत गणेशपुरे राहतील, अशी माहिती आयोजन समितीचे पुष्पराज गावंडे व श्याम ठक यांनी दिली.वºहाडी साहित्य संमेलनाची सविस्तर माहिती देण्याकरिता सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आयोजकांनी माहिती दिली. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. साहित्य संमेलन स्थळाला स्व. उद्धव ज. शेळके साहित्यनगरी, असे नाव देण्यात आले. उद्घाटन सोहळ्यात डॉ. धनंजय दातार यांच्या मसाला किंग-आठवणींचा प्रवास, प्रकाश पोहरे यांच्या उद्ध्वस्त विदर्भ, पुष्पराज गावंडे यांच्या यलाई कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. साहित्यकृतीकरिता देण्यात येणारे वºहाडी साहित्य पुरस्कार तसेच वºहाडरत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे.या संमेलनात डॉ. धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत भारत गणेशपुरे घेणार आहेत. या मुलाखतीद्वारे युवकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठीचा मूलमंत्र मिळणार आहे. साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कविसंमेलन, वºहाडी कॅटवॉक, वºहाडी रॅप, जोगवा, वºहाडातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रप्रदर्शनी अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.