अकोला जिल्ह्यात २.३५ लाख महिलांच्या जन-धन खात्यात प्रतिमहा ५०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:41 AM2020-04-04T11:41:07+5:302020-04-04T11:41:54+5:30
प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुुरू करण्यात आली आहे.
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार ९७ महिलांच्या जन-धन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपयेप्रमाणे तीन महिन्यांच्या कालावधीत १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनमार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जन-धन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा आदेश केंद्र शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत २ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यात बचत खाते असलेल्या जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार महिलांच्या बचत खात्यात प्रत्येकी प्रतिमहा ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एकूण १ हजार ५०० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याकरिता अनुदानाची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यादृष्टीने पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच ९ एप्रिलनंतर केव्हाही लाभार्थींना बँकेतून पैसे काढता येणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात प्रतिमहा ५०० रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. अनुदानाची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आहे.-आलोक तारेणिया व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक