- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ४१४ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले असून, कर्ज वाटपाची मुदत संपली; परंतु जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळालेच नसल्याचे वास्तव आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार ११४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले होते. खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमार्फत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील कर्ज वाटपाची मुदत संपली; मात्र जिल्ह्यातील ३६ हजार ८६ शेतकºयांना कर्जाविनाच राहावे लागले.बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे वास्तव!जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ३८ हजार ८० शेतकºयांना ३५० कोटी २४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५५ हजार ५१९ शेतकºयांना ३७७ कोटी ८८ लाख रुपये व ग्रामीण बँकेमार्फत १२ हजार ८१५ शेतकºयांना ११७ कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.रब्बी हंगामात ७,५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील ७ हजार ५०० शेतकºयांना ६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४१४ शेतकºयांना ८४५ कोटी ७६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी १ आॅक्टोबरपासून कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक