अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २२७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३६१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ जणांसह, जीएमसी येथील पाच, मोठी उमरी, वानखडे नगर, बाळापूर, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन, रेणूका नगर, डाबकी रोड, गोडबोले प्लॉट, लक्ष्मी नगर, दुबेवाडी, मराठा नगर, मोहोड कॉलनी, न्यु तापडीया नगर, कोठारी वाटीका, भागवत वाडी, खोपरवाडी, मलकापूर, कौलखेड, पिंपळखुटा, पारद, पारस, घुसर, मुर्तिजापूर व दहिहांडा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.डाबकी रोड येथील पुरुषाचा मृत्यूमंगळवारी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण श्रीवास्तव चौक, डाबकी रोड येथील ७५ वर्षीय पुरुष असून, त्यांना २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.१,६३७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,३६१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,६३७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.