अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत लाचखोर पोलीस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:09 AM2018-01-12T02:09:58+5:302018-01-12T02:10:21+5:30
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे.
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका ६१ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर इसमास जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एएसआय हनुमान सोनटक्के या पोलीस कर्मचार्याने ९ जानेवारी रोजी तीन हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तक्रारीची पडताळणी केली असता, पोलीस कर्मचारी हनुमान रामदास सोनटक्के याने तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ११ जानेवारी रोजी लाच घेण्यासाठी पोलीस कर्मचारी हनुमान सोनटक्के आला असता, सापळा रचून असलेल्या एसीबीने त्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या कर्मचार्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.