अकोला : पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल अन् बैलगाडी मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:48 AM2018-02-01T00:48:23+5:302018-02-01T00:51:07+5:30
अकोला : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा भव्य निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्या सायकली अन् तीन बैलगाडीमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डीझल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या काँग्रेसचा हा मोर्चा भव्य निघेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्या सायकली अन् तीन बैलगाडीमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेसमधील एक गट सायकलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर दुसरा गट बैलगाडीतून दाखल झाल्याने काँग्रेसमधील गटबाजी अधोरेखीत झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते, त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
आज दुपारी साडेतीन वाजता अकोल्यात जिल्हा काँग्रेस मुख्यालय स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गाने हा मोर्चा निघाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, शहराध्यक्ष बबनराव चौधरी आणि प्रदेश सरचिटणीस मदन भरगड असे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी व जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे बैलगाडीने मोर्चात सहभागी झाले तर प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्या नेतृत्वातील पदाधिकारी सायकलने दाखल झाले.
सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत नंतर निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार नतीकोद्दीन खतीब, माजी जि.प. अध्यक्ष दादाराव मते पाटील, डॉ.सुभाषचंद्र कोरपे, बाबाराव विखे पाटील, रमाकांत खेतान, काँग्रेसचे महानगर सचिव राजेश भारती, महासचिव प्रकाश तायडे, नगरसेवक साजिद खान पठाण, कपिल रावदेव, महेश गणगणे, राजेश मते, अविनाश देशमुख, सुषमा निचळ, पुष्पा गुलवाडे, नगरसेवक मो. इरफान, आकाश कवडे, हेमंत देशमुख पराग कांबळे? शे. हारूण, मो. जफरभाई, पप्पु खान, तश्वर पटेल, सत्यप्रकाश घाटोळे, बाळासाहेब बाजड, प्रकाश उपाध्ये, महेंद्र गवई, अविनाश राठोड, नागसेन शिरसाट, विजय राजपूत, शिवानी किटे, पुष्पा देशमुख, आदी उपस्थित होते.