अकोला : रेती टाकण्याच्या वादावरून प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:03 AM2018-02-13T02:03:39+5:302018-02-13T02:03:51+5:30
अकोला : घराचे बांधकाम सुरू असताना आलेली रेती दुसर्याच्या घरासमोर टाकण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एक इसम गंभीर जखमी झाला असल्याची घटना मोठी उमरीतील फत्तेपूरवाडीत घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मोठी उमरीतील फत्तेपूर वाडी येथे राहणारे ज्ञानेश्वर गावंडे याने तक्रार दिली, की त्यांच्या घराशेजारी राहणारे मोरखडे यांची रेती शनिवारी रात्री आमच्या घरासमोर टाकण्यात आली. ती येथे टाकू नये, असे मोरखडे यांना सांगितल्यावर वाद होऊन यामध्ये मोरखडे कुटुंबातील मंगेश मोरखडे व गजानन मोरखडे यांनी गावंडे यांच्या कुटुंबावर सब्बल व कुर्हाडीने हल्ला केला.
या हल्ल्यात संतोष गावंडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोळ्याच्या खाली कुर्हाडीचा घाव असून, त्यांच्या हातावर सब्बलीने वार करण्यात आला आहे. तर ज्ञानेश्वर याने घराचे दार लावून घेतल्यानंतर सब्बलने ते तोडण्यात येऊन घराची तोडफोड करण्यात आली.
ज्ञानेश्वर हा मागील दरवाज्याने पळून गेल्यामुळे तो या हल्ल्यातून वाचला. जखमी संतोष गावंडे यांना ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून, मोरखडे यांच्या विरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.