अकोला जिल्ह्यातील ६७ रस्त्यांचा मुख्यमंत्री सडक योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:18 AM2018-09-15T10:18:17+5:302018-09-15T10:20:57+5:30

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २०१९-२० करिता जिल्ह्यात १९५ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी ६७ रस्त्यांची निवड करण्यात आली.

In the Akola district, 67 roads are included in Chief Minister's scheme | अकोला जिल्ह्यातील ६७ रस्त्यांचा मुख्यमंत्री सडक योजनेत समावेश

अकोला जिल्ह्यातील ६७ रस्त्यांचा मुख्यमंत्री सडक योजनेत समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात १९५ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी ६७ रस्त्यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील ६७ रस्त्यांची निवड करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २०१९-२० करिता जिल्ह्यात १९५ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी ६७ रस्त्यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीच्या बैठकीत शुक्रवारी जिल्ह्यातील ६७ रस्त्यांची निवड करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा निवड समितीच्या बैठकीत २०१९-२० या वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात १९५ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी ६७ रस्त्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या ६७ रस्त्यांच्या कामांसाठी शासनाची मान्यता घेणे, निविदा प्रक्रिया राबविणे व कामांचा कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही निर्धारित नियोजनानुसार जिल्हा निवड समितीचे सचिव तथा संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

रस्ते कामांसाठी निवड केलेले असे आहेत ६७ रस्ते!
अकोला तालुका :
राष्ट्रीय महामार्ग क्र .६ ते डोंगरगाव, प्रमुख जिल्हा मार्ग (प्रजिमा) क्र .१२ ते बहिरखेड, राज्य मार्ग - २८४ ते वरुडी, प्रजिमा- १८ ते देवळी, आपोती बु. ते आपोती खुर्द, राज्य मार्ग- २८० ते सुलतान अजमपूर, वाकी ते आखतवाडा, उमेरी ते चाचोंडी, टाकळी जळम ते अमानतपूर, राष्ट्रीय महामार्ग क्र .१६१ ते हिंगणा- बारलिंगा, राज्य मार्ग २८१ ते उगवा, प्रजिमा- ११ ते पाळोदी गोत्रा, राज्य मार्ग २८१ ते सुकोडा-खडकी, राज्य मार्ग २८१ ते कानडी, राज्य मार्ग २८१ ते सांगवी खुर्द-फर्माबाद, डाबकी ते दुधलम रस्ता.
अकोट तालुका : राज्य मार्ग २८१ ते अंबाडी, राज्य मार्ग २८१ ते तांदूळवाडी, राज्य मार्ग २८१ ते नागापूर, राज्य मार्ग ४७ ते जळगाव नहाटे, राज्य मार्ग ४७ ते कोलविहीर, बोर्डी ते रामापूर, इजिमा -१ ते जितापूर, पातोंडा ते ठोकबर्डी, राज्य मार्ग ४७ ते पिंप्री जैनपूर रस्ता.
बाळापूर तालुका : व्याळा ते गायगाव रेल्वे स्टेशन, पारस ते बोराळा, प्रजिमा ९ ते शिंगोली-मोरझाडी, राज्य मार्ग २७९ ते सांगवी, नांदखेड ते हसनापूर, व्याळा ते देगाव रस्ता.
बार्शीटाकळी तालुका : भेंडगाव ते वडाळा, चेलका ते बोरमळी, पाटखेड ते रुद्रायणी, राज्य मार्ग २७३ ते पिंपळखुटा, इजिमा ३७ ते कोथळी -वाघागड, इजिमा ३४ ते पिंपळगाव हांडे, इजिमा ३४ ते सावरखेड, राज्य मार्ग २७३ ते रेडवा, प्रजिमा २० ते चोहोगाव रस्ता.
मूर्तिजापूर तालुका : माना ते पोही, कुरुम ते वडगाव, लाईत जोडरस्ता, सोनोरी ते पोता, राज्य मार्ग २०० ते बल्लारखेड, वीरवाडा जोडरस्ता, राज्य मार्ग २८२ ते आरखेड निंबा, शेरवाडी ते धानोरा, प्रजिमा १४ सांजापूर ते शिरसो रस्ता.
पातूर तालुका : अंधारसावंगी ते भौरद, राज्य मार्ग २८४ ते निमखेड, प्रजिमा २५ दिग्रस बु. ते राज्य मार्ग २७९ दिग्रस खुर्द, चारमोळी ते चोंढी, प्रजिमा २७ ते पास्टुल, राष्ट्रीय महामार्ग क्र .१६१ ते शिर्ला, गावंडगाव ते पाडशिंगी, बोडखा जोडरस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्र .१६१ ते चिंचखेड रस्ता.
तेल्हारा तालुका : भांबेरी ते खेलदेशपांडे, इजिमा २० ते मालपुरा, राज्य मार्ग २७१ राणेगाव ते भोकर, राज्य मार्ग ४७ ते मालठाणा बु., मनब्दा अटकळी ते तेल्हारा तालुका हद्द, टाकळी ते पाथर्डी रस्ता.

 

Web Title: In the Akola district, 67 roads are included in Chief Minister's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.