अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:05 AM2017-11-29T02:05:24+5:302017-11-29T02:06:07+5:30

अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना  हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  १0.२ अंश नोंद केली.

Akola district discharges mercury; Growth in the cold, the citizens filled with huddoody! | अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी!

अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी!

googlenewsNext
ठळक मुद्देअकोला  १२.२ अंश डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नोंदविले १0.२ अंश 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना  हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  १0.२ अंश नोंद केली.
मागील पंधरवड्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात २0  अंशापर्यंत वाढ झाली होती. मागील पाच सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण  निवळल्याने थंडीत वाढ झाली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २७  नोव्हेंबर रोजी ९.६ किमान तापमानाची नोंद केली होती. दरम्यान, तापमान  घटल्याने पुन्हा एकदा नागरिकांनी गरम कपडे खरेदी करण्यासाठीची गर्दी केली  असून, रात्री व पहाटे  ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. ही थंडी  सध्यातरी हरभरा,गहू पिकास पोषक मानली जात आहे. 

Web Title: Akola district discharges mercury; Growth in the cold, the citizens filled with huddoody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.