अकोला : विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, हवामान वेगाने बदलत आहे. उन्हाचा पारा वाढला आहे. दि. १३ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान राज्यात सर्वाधिक ४3.८ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.एप्रिल महिन्याचा पंधरवाडा संपला असून, विदर्भात उन्हाचे चटके वाढू लागले आहे. अकोला तापमानाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असते. त्याची चुणूक आताच दिसू लागली असून, एप्रिलच्या पंधरवड्यात अकोल्याचे कमाल तापमान ४२.८ अंशांवर पोहोचले आहे. राज्यातही कमाल तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा अंगाला झोंबत आहेत. पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भात कमाल तापमान वाढ झाली आहे.यावर्षी जानेवारीपासूनच विदर्भात अधूनमधून अवकाळी पाऊस होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .आता अवकाळी पाऊस पडत असल्याने फळे भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे .अशातच आठवड्यात उन्हाचा पारा वाढला आहे पारा असाच कायम राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .सोमवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाल्याचे होते अमरावती चे कमाल तापमान ४१.६ अंशांवर पोहोचले होते बुलढाण्याचे कमाल तापमान ३८.८,ब्रह्मपुरी ४०.२ ,चंद्रपूर ४०.५ ,गोंदिया 39.८,नागपूर ४१.१ तर वर्धा येथील कमाल तापमान ४१.६ होते.दरम्यान ,12 एप्रिल रोजी अकोल्याच्या काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला उत्तर कर्नाटक पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा,मध्यप्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे चित्र आहे त्यामुळे छोट्या दोन दिवस विदर्भात वादळी वाºयासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .