अकोला जिल्हा; बाळ दगावल्याप्रकरणाची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी; ‘कारणे दाखवा’ बजावणार
By atul.jaiswal | Published: December 21, 2017 12:18 PM2017-12-21T12:18:28+5:302017-12-21T12:24:56+5:30
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत बुधवारी घटनेची चौकशी केली.
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी घटनेची चौकशी केली. दरम्यान, चौकशी अहवाल तयार झाला असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) या बालकाला मंगळवारी सकाळी त्याच्या आई - वडिलांनी साडेआठ वाजताच्या सुमारास मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले; मात्र त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैक एकही उपस्थित नव्हता. त्यामुळे नजीकच असणाºया आयुर्वेदिक दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनयना यांना पाचारण करण्यात आले; मात्र, त्यादेखील उशिराने पोहोचल्या. त्या पोहोचेपर्यंत बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. संबंधित महिला डॉक्टरने बालकाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनमुळे आरोग्य सेवेचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी रात्री दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी पातूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार, डॉ. विजय जाधव यांनी मळसूर आरोग्य केंद्रात जाऊन संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले व तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाºयांना पाठविला. दरम्यान, मळसूर आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मळसूर येथील घटनेची चौकशी तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत करण्यात आली आहे. सदर बालकाच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
- डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.