जिल्हा दूध संघ निवडणूक; पाच उमेदवार अविरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:08 PM2019-08-27T14:08:54+5:302019-08-27T14:09:01+5:30

विविध दूध संस्थाचे तालुका सर्वसाधारण जागे उभे असलेले ५ उमेदवार अविरोध निवडून आले.

Akola District Milk Union Elections; Five candidates unopposed! | जिल्हा दूध संघ निवडणूक; पाच उमेदवार अविरोध!

जिल्हा दूध संघ निवडणूक; पाच उमेदवार अविरोध!

Next

अकोला: जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवार, २६ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील विविध दूध संस्थाचे तालुका सर्वसाधारण जागे उभे असलेले ५ उमेदवार अविरोध निवडून आले. तर सर्वसाधारण अकोट मतदारसंघ व महिला मतदार संघासाठी जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याने येथे २१ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
जिल्हा प्राथमिक सहकारी दूध उत्पादकांचा महासंघाची निवडणूक दोन वेळा रद्द झाली होती. एका निवडणुकीत उमेदवारी अर्जच प्राप्त न झाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. दूध संघावर २४ संचालक निवडून देण्यासाठी आता पुन्हा निवडणूक लागली असून, १६ आॅगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. २६ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज २४ आॅगस्ट रोजी उमेदवारांनी दाखल केले होते. सोमवारी अर्जाची छाननी होती. यात तालुकास्तरावरील संस्था सदस्याचे प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने अकोला तालुका सर्वसाधारण जागेवरू न शिवराज मोहोड, बार्शीटाकळी तालुक्यातील सतीश महागावकर, मूर्तिजापूरमधून सुभाष हजारी, पातूर तालुका मोहन देशमुख, तेल्हारा राजेश काळे अविरोध निवडून आले. अनुसूचित जाती, व्हीजेएनटी, सर्वसाधरण व महिला मतदारसंघासाठी उमेदवार उभे आहेत. ११ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

 

Web Title: Akola District Milk Union Elections; Five candidates unopposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.