अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:18 PM2019-03-04T14:18:49+5:302019-03-04T14:18:58+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, या आठवड्यात जवळपास पन्नासच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, या आठवड्यात जवळपास पन्नासच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील किमान दहा पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
२०१४ च्या निवडणुकीवेळी जिल्ह्यात कार्यरत असलेले किंवा मूळ अकोला जिल्ह्याचे रहिवासी असलेले तसेच तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाºयांच्या बदल्या करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती; मात्र २०१४ च्या निवडणुकीवेळी कार्यरत असल्याची अट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे मिळून ५० अधिकाºयांच्या बदल्या होणार आहेत. बदलीनंतर तेवढेच नवीन पोलीस अधिकारी शहरात येणार आहेत. २२ जानेवारी रोजी पोलीस प्रशासनाला लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. यात लोकसभा निवडणुकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे, अशा अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदलीपात्र असलेल्या संबंधित सर्वांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात येणार असून, त्यांच्या पसंतीची तीन ठिकाणे कळविण्याबाबत त्यांना सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. १ जून २०१५ ते ३१ मे २०१७ या कालावधीत पोटनिवडणूक झालेल्या ठिकाणावरील अधिकाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नव्या निकषामुळे बदलीच्या कचाट्यात सापडलेले अनेक अधिकारी बचावले आहेत. आयोग व पोलीस महासंचालकांकडून दिलेल्या आदेशानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्या आधीच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून अधिकाºयांना बदलीच्या जागी रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.