अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त ९० हजार ४७१ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भागविण्यात येत आहे.पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला. जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत (१७ जूनपर्यंत) जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ९० हजार ४७१ लोकसंख्या असलेल्या ५२ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका गावेअकोला २४बार्शीटाकळी ०८अकोट ०३बाळापूर ०८पातूर ०८मूर्तिजापूर ०१.......................................एकूण ५२