लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर असतील, तर बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. ते दीक्षांत भाषण करतील. यावर्षी प्रावीण्यप्राप्त २९ विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी रविवारी शेतकरी सदन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २0१९ मध्ये ५0 वर्ष पूर्ण होत असल्याने कृषी सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली असून, कृषी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे डॉ. भाले यांनी यावेळी सांगितले. यावर्षी बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे १,७७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उद्यान विद्याचे १२३, वनविद्या २९, कृषी जैवतंत्रज्ञान १0७, कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयाचे ३४, अन्नशास्त्र ५८ तर बीटेक कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या १२७ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. एमएससीचे (कृषी)२३८, उद्यानविद्या ३५, वनविद्या १0, एमटेक कृषी अभियांत्रिकी २३, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ३४, तर पीएच.डी. ४१ मिळून २,६३२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यातील १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी स्वीकारतील. या समारंभाला नाबार्ड माजी अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी यांची उपस्थिती राहील. यावर्षी २९ सुवर्ण, १५ रौप्य, ३१ रोख व तीन पुस्तक स्वरू पात असे ७८ पदके व बक्षिसे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत.
अकोला : डॉ. पंदेकृविचा सोमवारी ३२ वा दीक्षांत समांरभ; १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी ग्रहण करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 8:49 PM
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर असतील, तर बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
ठळक मुद्देप्रावीण्यप्राप्त २९ विद्यार्थी सुवर्ण पदाचे मानकरी