लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.धामना नदीपात्रात याच गावातील रहिवासी संतोष शेषराव भगत, गोपाल मुदगल भांबेरे, वैभव गोपाल भांबेरे, सुखदेव भिकाजी भांबेरे, श्याम मुदगल भांबेरे, गजानन रामकृष्ण शेळके, ज्ञानेश्वर श्रीराम पाकदुने व तुळशीराम नागोराव पाक दुने हे एका तवेरा वाहनामध्ये २६ नोव्हेंबर २0१३ रोजी पूर्णा नदीपात्रात घातक शस्त्रास्त्र घेऊन बसलेले होते. या आठ आरोपींनी धामना गावातील नागरिकांना मारहाण करीत लुटमार केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. उरळ पोलीस पूर्णा नदीपात्रात जाताच यातील आरोपी संतोष भगत याने एका पोलीस कर्मचार्याचा मोबाइल व रोख रक्कम घेऊन पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या सात साथीदारांनी पोलिसांना शस्त्रांचा धाक दाखवून अडवून ठेवले. त्यानंतर पोलीस कर्मचार्यांना ईल शिवीगाळ करीत धाक दाखविला. पोलीस घातक शस्त्रांपुढे हतबल ठरल्याने आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात सदर आठ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२, ३५३, १८६ व ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एन. इंगोले यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील पाच साक्षीदार तपासले. यामधील दोन साक्षीदार फितूर झाले; मात्र तीन पोलीस कर्मचारी असलेले साक्षीदार साक्षीवर कायम होते. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संतोष भगत या आरोपीस कलम ३९२ अन्वये पाच वर्षांची शिक्षा सुनावली, तर दंडही ठोठावला. इतर सात आरोपींना कलम १८६, ३५३, ४२७ अन्वये प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. आशीष पुंडकर यांनी कामकाज पाहिले.
अकोला : धामना लुटमारीतील आठ आरोपींना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:36 PM
अकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
ठळक मुद्देपोलिसांचा पळविला होता मोबाइल व रोखदोन साक्षीदार फितूर, तीन कायमसात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा