बार्शीटाकळी : तालुक्यातील राजनखेड शिवारात ५२ वर्षीय शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री घडली. लालसिंग भागा राठोड असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप कळले नसून, अज्ञात इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजनखेड येथील लालसिंग राठोड हे ६ डिसेंबर रोजी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी व मुलगीही होती. दुपारी ३ वाजता त्यांची पत्नी आणि मुलगी शेतातून परत आले. मात्र, लालसिंग राठोड हे परत आले नाही. त्यांना शोधण्यासाठी सरपंच विजयसिंग जाधव व मृतकाचा चुलत भाउ हिंम्मत हरीचंद्र राठोड हे गेले होते. त्यांना रात्री १०.३० वाजता शेतातील धुऱ्यावर मृतक लालसिंग राठोड यांचे प्रेत दिसून आले. त्यांच्या डोक्यावर व मानेवर तिक्ष्ण अवजाराने घाव घातलेले दिसले. ते घाव कुऱ्हाडीचे असु शकतात अशी फिर्याद मृतकाचा मुलगा किरण लालसिंग राठोड याने बार्शीटाकळी पोलिसत दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास खांडावये करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे , बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल धस, सहा.पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, जमादार सुनिल भटकर, शिपाई चंद्रकांत डोईफोडे, ज्ञानेश्वर गिते, लक्ष्मण महल्ले, सुरेंद्र दाभाडे, भास्कर सांगळे आदींनी घटनास्थळाला भेट देउन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यात शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 5:39 PM
बार्शीटाकळी : तालुक्यातील राजनखेड शिवारात ५२ वर्षीय शेतकऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री घडली.
ठळक मुद्देराजनखेड शिवारात बुधवारी रात्री घडली घटना.शेतातील धुऱ्यावर मृतक लालसिंग राठोड यांचे प्रेत दिसून आले.अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यावर व मानेवर तिक्ष्ण अवजाराने घाव घातले.