अकोला : मतदारदिनी जिल्हय़ातील दिव्यांग मतदारांचा होणार सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:04 AM2018-01-18T00:04:44+5:302018-01-18T00:05:24+5:30
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा स्तर, विधानसभा मतदारसंघ स्तरावर आणि मतदान केंद्र स्तरावर मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकार्यांमार्फत मतदार दिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्रांचे वाटप तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तसेच निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांना भाग घेणे सुलभ व्हावे, यासाठी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांमार्फत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संदेशाचे होणार वाचन!
मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित मतदार दिन कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे, तसेच चित्रफीतही दाखविण्यात येणार आहे.