अकोला क्रीडा प्रबोधिनीला ८ सुवर्ण पदकांसह अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:37 PM2018-01-10T19:37:16+5:302018-01-10T19:38:46+5:30

अकोला: सातारा येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत झालेल्या ७७ व्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांनी शानदार प्रदर्शन करीत ८ सुवर्ण पदकांसह सामूहिक विजेतेपद पटकाविले.

Akola Krida Prabodhini is the champion with 8 gold medals | अकोला क्रीडा प्रबोधिनीला ८ सुवर्ण पदकांसह अजिंक्यपद

अकोला क्रीडा प्रबोधिनीला ८ सुवर्ण पदकांसह अजिंक्यपद

Next
ठळक मुद्दे७७ वी महाराष्ट्र राज्य युवा अजिंक्यपद स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सातारा येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत झालेल्या ७७ व्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या बॉक्सरांनी शानदार प्रदर्शन करीत ८ सुवर्ण पदकांसह सामूहिक विजेतेपद पटकाविले.
अकोला क्रीडा प्रबोधिनी संघातील ऋतिज तिवारी राज्यातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर ठरला. ४९ किलो वजन गटात शिवाजी गेडाम, ५२ किलो वजन गटात अजय पेदार, ५0 किलो वजन गटात कैलास जाधव, ६४ किलो वजन गटात तुषार बिसने व ७५ किलो वजन गटात साकिब पठाण व ८१ किलो वजन गटात ऋतिज तिवारी यांनी पुरू ष गटात सुवर्ण पदक पटकाविले. महिला गटात ४८ किलो वजन गटात गौरी जयसिंगपुरे व आंतरराष्ट्रीय बॉक्सर साक्षी गायधने हिने ८१ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. विशाल तुपे याने ५६ किलो वजन गटात व ६९ किलो वजन गटात श्रृतीक शिंदे याने रौप्य पदक पटकाविले.
अकोला क्रीडा प्रबोधिनीला राज्यातील सर्वश्रेष्ठ संघ घोषित करण्यात आले. संघासोबत आदित्य मने, दीपक खंडारे, अनंता चोपडे होते. या स्पर्धेत अक्षय टेंभूर्णीकर, विशाल सुनारीवाल यांनी पंच म्हणून काम पाहिले. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

Web Title: Akola Krida Prabodhini is the champion with 8 gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.