लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंटेनरमध्ये कोंबून नेण्यात येणार्या ५२ गुरांची अकोला पोलिसांनी श्निवारी रात्री सुटका केली असून, गुरांची तस्करी करणार्या टोळीला जेरंबद केले. रविवारी त्यांच्यावर बाळापूूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.त्यांच्याकडून २२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नागपूरवरून औरंगाबादकडे गुरांनी खचाखच भरलेला कंटेनर व्याळा येथून जात असताना तसेच बाळापूरकडून अकोल्याकडे येत असलेली महिन्द्रा बोलेरो या दोन वाहनांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्रभर पाळत ठेवून दोन्ही ही वाहने पकडली. गुरांनी भरलेला कंटेनर जात असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली होती. त्यांनी शनिवारी मध्यरात्री या मार्गावर सापळा लावला होता. या कारवाईत गुरांना नेणारा तस्कर मो. वसीम मो. शमी, रियाज अहमद अब्दुल गणी, सलीम कुरेशी मो. तस्लीम कुरेशी, मो. शाहरूख कुरेशी रफिक कुरेशी सर्व राहणार टेकानई बस्ती, आझाद नगर नागपूर या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून २८ म्हैस किंमत २ लाख ८0 हजार, वगार १६ किंमत १ लाख २८ हजार, कंटेनर १२ लाख, मोबाइल २0 हजार, असा एकूण १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बाळापूरकडून अकोल्याकडे येत असलेल्या बोलेरो महिन्द्रा पीकअप या वाहनामध्ये आठ गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने पुन्हा सापळा रचला् त्यातील ८0 हजार रुपये किमतीच्या गुरांना जीवदान दिले. बोलरो गाडी किंमत ४ लाख रुपये, दोन मोबाइल किंमत १२ हजार रुपये, असा एकूण ४ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मो. मुस्ताक मो. याकुब, शे. फिरोज शे. दाऊद दोघेही राहणार बाळापूर या आरोपींवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
औरंगाबादला नेत होती गुरे!नागपूरवरून औरंगाबादाला म्हैस व त्यांच्या पिल्लांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापयर्ंत गुरांच्या चार कारवाईत ८१ गोवशांना जीवनदान दिले, तर रविवारी केलेल्या कारवाईत ५२ गुरांना, अशा एकूण १३३ गुरांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने जीवनदान दिले. अकोल्यातील सर्वात मोठी कारवाई पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केली.
हे तस्कर झाले फरारशेख सगीर रा. बाळापूर, अहमद शेख, अहमद, अखिल कुरेशी, अश्पाक कुरेशी, फारूक कुरेशी, वसीम कुरेशी, शेख रहीम, मो. मिया सर्व राहणार नागपूर व धनपाल कुर्जेकर राहणार भंडारा हे सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.