लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकस्मात लादलेल्या भारनियमाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योगांनाही सोसावा लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. भारनियमनाचे चटके अकोल्यातील नागरिकांना लागत असले, तरी अजूनही अकोल्यातील एमआयडीसी यातून बचावली आहे. अजूनतरी अकोला एमआयडीसीला भारनियमनाचा फटका बसलेला नाही.कोळसा आणि पाण्याच्या अभावामुळे राज्यावर अकस्मात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. या लोडशेडिंगची झळ औरंगाबादच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला बसून, शंभर कोटींचा फटका बसला. जवळपास साडेचारशे उद्योग बंद पडलेत. त्यामुळे हजारो कामगारांना रोजगारापासून वंचित राहावे लागले. राज्यातील विविध उद्योगावर परिणाम झाल्याने अकोल्यावर याचा काय परिणाम झाला याचा आढावा घेतला असता, अकोल्यात त्याचा काहीएक परिणाम पडला नसल्याचे समोर आले आहे.
प्रत्येक सोमवारी अकोला एमआयडीसीचा वीज पुरवठा नियमित खंडित असतो. त्यामुळे सर्व उद्योजक कामगारांना रजा देतात. कधीतरी अचानक लोडशेडिंग केले जाते. त्यामुळे मोठा तोटा उद्योजकांना सोसावा लागतो. राज्याच्या या अकस्मात भारनियमनाचा यंदा अकोल्यावर भार पडलेला नाही.- श्रीमंत वासू, उद्योजक, एमआयडीसी अकोला.