वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभी राहील अकोला मनपाची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:37 PM2018-08-24T12:37:29+5:302018-08-24T12:38:44+5:30

Akola Municipal's building will stand by the architect's ideas | वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभी राहील अकोला मनपाची इमारत

वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभी राहील अकोला मनपाची इमारत

Next
ठळक मुद्देवास्तुविशारदांची निवड करण्यासाठी निविदा काढून कामाला लागण्याचे निर्देश महापौरांनी गुरुवारी नगररचना विभागाला दिले.महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निविदा काढण्यास हिरवी झेंडी दिली होती.


अकोला : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह जुन्या बस स्थानकाच्या जागेवर तसेच जनता भाजी बाजारच्या जागेवर उभारल्या जाणारी कमर्शियल कॉम्पलेक्सची इमारत बांधकाम क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास असणाऱ्या नामवंत वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभारण्यासाठी महापौर विजय अग्रवाल सरसावले आहेत. सरस वास्तुविशारदांची निवड करण्यासाठी निविदा काढून कामाला लागण्याचे निर्देश महापौरांनी गुरुवारी नगररचना विभागाला दिले.
शहरातील जनता भाजी बाजारच्या जागेवर व्यावसायिक संकुल तसेच भाजी बाजाराचे आरक्षण आहे. टॉवर चौकातील जुने बस स्थानकाच्या जागेवर सिटी बस व व्यावसायिक संकुलाचे आरक्षण असून, बाजोरिया मैदानावर आॅडिटेरिअम हॉलचे आरक्षण आहे. या तीनही जागेचा विकास करण्यासाठी महापौर विजय अग्रवाल शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. मध्यंतरी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यासह शहरातील विकास कामांचा आढावा घेतला असता त्यावेळी या तीनही जागेच्या विकासासाठी निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते. या जागेच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे सुमारे ३० कोटी रुपये शुल्क जमा करावे लागणार होते. निविदा काढल्यानंतर शुल्काचा पहिला हप्ता शासनाकडे जमा करण्यास तयार असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निविदा काढण्यास हिरवी झेंडी दिली होती. त्या धर्तीवर महापौर विजय अग्रवाल सरसावले आहेत.

वास्तुविशारदांची होणार निवड!
महापालिकेच्यावतीने शहरात उभारल्या जाणाºया इमारती अतिशय सुंदर, देखण्या व दर्जेदार असण्याबाबत महापौर अग्रवाल आग्रही आहेत. त्यासाठी राज्यातील नामवंत वास्तूविशारद यांची निवड करण्यासाठी निविदा बोलाविल्या जातील. पात्र निविदांमधून संबंधित वास्तुविशारदची निवड केली जाईल. त्यानंतर मनपाच्या स्तरावर वास्तुविशारदांचा समावेश असणाºया समितीचे गठन करून समितीच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचे कामकाज पूर्ण केले जाणार आहे. तसे निर्देश महापौर अग्रवाल यांनी गुरुवारी नगररचना विभागातील अधिकाºयांसह शहर अभियंत्यांना दिल्याची माहिती आहे.

 

Web Title: Akola Municipal's building will stand by the architect's ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.