Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर

By Atul.jaiswal | Published: July 4, 2023 02:57 PM2023-07-04T14:57:49+5:302023-07-04T14:58:09+5:30

Akola: एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत.

Akola: Over crores of electricity consumers prefer to pay electricity bills online, 35 per cent increase in three years | Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर

Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर

googlenewsNext

- अतुल जयस्वाल
अकोला : एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.

महावितरणकडून ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व "महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रु. ५००० पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने RTGS /NEFT द्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.

१.२५ टक्के सूट
‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे.

ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. तरी जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
- फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, अकोला परिमंडळ, महावितरण

Web Title: Akola: Over crores of electricity consumers prefer to pay electricity bills online, 35 per cent increase in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला