लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवसेना वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका गटाने दुसर्या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्यानंतर या हल्ला-प्रतिहल्ल्यात एक जण ठार झाला, तर दुसर्या गटातील एक जण गंभीर जखमी झाला. या खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाने वाढ केली असून, प्राणघातक हल्लय़ातील आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शहरातील शिवसेना वसाहतमधील रहिवासी तुषार नागलकर याच्या घरी बुधवार, १३ डिसेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत धुंद असलेले शैलेश अढाऊ, अश्विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान यांच्यासह आणखी काही युवकांनी त्याला घराबाहेर बोलावून ईल शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर नागलकरच्या गटाने विरोधी गटावर सशस्त्र हल्ला चढविला. यामध्ये शैलेश अढाऊ याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्यावर तो जागीच ठार झाला, तर ज्या तुषार नागलकरच्या घरावर हल्ला चढविण्यात आला, त्यामध्ये नागलकरही गंभीर जखमी झाला. सोबतच अश्विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान हे गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दोन्ही गटांतील युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामधील खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसांची वाढ केली असून, प्राणघातक हल्ल्यातील आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.
अकोला : शैलेष अढाऊ खुनातील आरोपीेंच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:40 PM
शिवसेना वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका गटाने दुसर्या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्यानंतर या हल्ला-प्रतिहल्ल्यात एक जण ठार झाला, तर दुसर्या गटातील एक जण गंभीर जखमी झाला. या खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाने वाढ केली असून, प्राणघातक हल्लय़ातील आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ठळक मुद्देप्राणघातक हल्ल्यातील आरोपी कारागृहात