हिंगोलीतील मुलगी अकोला पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Published: May 17, 2017 02:07 AM2017-05-17T02:07:26+5:302017-05-17T02:07:26+5:30
अकोला: हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हरविलेली मुलगी मंगळवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलिसांना बसस्थानकावर आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हरविलेली मुलगी मंगळवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलिसांना बसस्थानकावर आढळली, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अमरावती येथून आलेल्या या मुलीला बसस्थानक पोलिसांनी विश्वासात घेऊन ठाण्यात नेले. अमरावती येथून अल्पवयीन मुलगी बसमध्ये बसून अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर आली. तिला काही नागरिकांनी बसस्थानक पोलीस चौकीमध्ये नेले. एकटी असल्याने पोलिसांनी अधिक चौकशी करून तिला पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिने हिंगोली जिल्ह्यातील वाघगळी येथे राहत असल्याचे सांगितले. ती हरविली असल्याची फिर्याद गोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांनी दिली. त्यासोबतच त्या मुलीच्या काकांना व भावास माहिती देण्यात आली आहे.