लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंगोट यांचे भीम नगर परिसरात वाढत असलेले वर्चस्व सहन न झाल्यामुळे, त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस त पासात निष्पन्न झाले आहे. खदान पोलिसांनी आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. माधव नगरातील गजानन विहार अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रशांत सुखलाल निंगोट हे माजी आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या संघटनेमार्फत सामाजिक व क्रीडा कार्यामध्ये अग्रेसर होते. गत काही वर्षांमध्ये त्यांच्या नेतृ त्वात युवकांचे मोठे संघटन उभे राहिले होते. गुरुवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांत निंगोट घरी असताना, भीम नगरात राहणारे आकाश ऊर्फ पव्या सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा सिरसाट, अंकुश यांच्यासह चार अनोळखी युवक त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी प्रशांत निंगोट यांना फोन लावला आणि त्यांना बाहेर बोलावले. निंगोट बाहेर आल्यावर चर्चा करण्यासाठी कुठेतरी बसू, असे सांगितले. त्यामुळे प्रशांत निंगोट यांनी मोटारसायकल काढली आणि अमर इंगळे याला सोबत घेतले. राऊंड रोडवरील पिल कॉलनीजवळ आल्यावर, आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा, अंकुश व इतर युवकांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली, तसेच निंगोट यांच्यासोबत असलेल्या अमर इंगळे यालाही लाथाबुक् क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. प्रशांत निंगोट हे भीम कायदा संघटनेच्या माध्यमातून युवकांना जोडून, भीम नगरातील आंबेडकर मैदानात कबड्डी व शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करायचे. त्यामुळे भीम नगर भागात निंगोट यांचे वर्चस्व वाढत होते. हीच बाब भीम नगरातील आकाश, आशुल्या, प्रेमा आणि अंकुश सिरसाट यांना सहन झाली नाही. यातून अनेकदा त्यांचे खटकेसुद्धा उडत. निंगोट यांचे वर्चस्व सहन न झाल्यामुळेच आरो पींनी कट रचून, त्यांची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दामले चौकात राहणारा अमोल भास्कर वाघमारे(३८) यांच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२ (खून), १२0 (ब) ( कट कारस्थान रचणे), ३२३, ३२५( गंभीर दुखाप त) नुसार गुन्हा दाखल केला. प्रशांत निंगोट यांच्यावर शुक्रवारी जुने शहरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
निंगोट हत्याकांडातील दोन आरोपी गजाआडप्रशांत निंगोट यांची राउंड रोडवरील पिल कॉलनीजवळ निर्घृण हत्या करणारे आकाश ऊर्फ पवे सिरसाट आणि आशिष ऊर्फ आशुल्या सिरसाट यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आकाश व आशिष याला अमरावती जिल्हय़ा तील पथ्रोटजवळील रहिमापूर गावातून अटक करण्यात आली. रात्री उशिरा आरोपींना खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिनकर बुंदे, नरेंद्र चाटी, आशिष ठाकूर, अश्विन सिरसाट, अमित दुबे, राजू वानखडे, शक्ती कांबळे, शेख हसन, मनोज नागमते यांनी केली.