बॉक्सिंग स्पर्धेत अकोला, पुणे संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 03:59 PM2019-12-20T15:59:58+5:302019-12-20T16:00:10+5:30
पाचवी कॅडेट व दहावी कब-क्लास राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व पुणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले.
अकोला: पाचवी कॅडेट व दहावी कब-क्लास राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व पुणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत कब क्लास बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार राजीव कौल पुणे, बेस्ट चॅलेंजर वैभव दामोदर अकोला क्रीडा प्रबोधिनी, मोस्ट प्रमोसिंग बॉक्सर हरिराम डुकरे सातारा यांनी पटकावला. कॅडेट ग्रुपमध्ये कुणाल पयाटिल रायगड, प्रेम पांडे जळगाव, मोहित कुळक र्णी पुणे शहर यांनी पुरस्कार मिळविले.
स्पर्धेत बेस्ट जजचा पुरस्कार विक्रम चंदेल अकोला, वेस्ट रेफरी पूजा शिंदे कोल्हापूर, बेस्ट कोच गणेश जाधव पुणे, आदित्य मने अकोला यांना प्रदान करण्यात आला. स्पर्धेत अकोल्याचे चेतन अंबोरे, वैभव जारवाला, रवींद्र पाडवी, शेख मोईन यांनी सुवर्णपदक पटकावले. कॅडेट गटात मोहित कुळकर्णी पुणे, मिरगन राव पुणे, चेतन अंबोरे अकोला, साई वेलघळ सातारा, वैभव जारवाल अकोला, कुणाल पाटील रायगड, रवींद्र पाडवी अकोला व ओम पवार पुणे यांनी विजय मिळविला.
या स्पर्धेदरम्यान पंच परीक्षा व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामुळे महाराष्ट्राला बॉक्सिंग खेळाचे २८ नवीन तांत्रिक अधिकारी मिळाले. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आणि कार्यशाळेचे आयोजन केले होते.