लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राधाकिसन प्लॉटमध्ये यमुना अपार्टमेंटमध्ये राहणारे नरेंद्र राठी यांच्या नोकराने, त्यांच्या पत्नीचा गळा दाबून, अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख पळविली होती. कोतवाली पोलिसांनी नोकराकडून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. राठी यांच्या दुकानात उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्हय़ातील गंजडुंडवारा येथे राहणारा मो. समीर मो. तस्लिम (२५) हा काम करायचा. तो १७ जानेवारी रोजी सायंकाळी राठी यांच्या घरी आला आणि राठी यांच्या पत्नीचा गळा दाबला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. समीरने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कपाटात ठेवलेले १५ हजार रुपये रोख घेऊन पसार झाला. कोतवाली पोलिसांनी मो. समीरला दिल्लीतील रॉजर गार्डन येथून अटक केली होती.
अकोला : राठी यांच्या नोकराकडून सहा लाखांचे दागिने जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:32 AM
अकोला : राधाकिसन प्लॉटमध्ये यमुना अपार्टमेंटमध्ये राहणारे नरेंद्र राठी यांच्या नोकराने, त्यांच्या पत्नीचा गळा दाबून, अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख पळविली होती. कोतवाली पोलिसांनी नोकराकडून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
ठळक मुद्देनरेंद्र राठी यांच्या नोकराने, त्यांच्या पत्नीचा गळा दाबून, अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख पळविली होती